महानगरपालिकेचा “चौधरी” लाच घेताना जाळ्यात
जालना -शहरातील बडी सडक वर असलेले वडिलोपार्जित पंजोबाचे घर नावावर लावून घेण्यासाठी आवश्यक असलेली नक्कल काढून घेण्यासाठी आठशे रुपयाची लाच घेताना जालना महानगरपालिकेचा फायरमन तथा कनिष्ठ लिपिकाचा अतिरिक्त पदभार असलेल्या नदीम अब्दुल रहमान चौधरी वय 33 वर्ष राहणार खडकपुरा मानवत, जिल्हा परभणी याला आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचे बडीसडकवर वडिलोपार्जित घर आहे. त्याच्या पंजोबाच्या घराची महानगरपालिकेत असलेली नक्कल काढून घेण्यासाठी तक्रारदाराने वारंवार अर्ज केले मात्र काम होत नव्हते, काम करून देण्यासाठी दस्तावेजाच्या खोलीची जबाबदारी असलेल्या नदीम चौधरी याने 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती .त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीची आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी पडताळणी केली या पडताळणी दरम्यान महानगरपालिका कार्यालयात पंचांसमक्ष नदीम चौधरी यांनी 1000 रुपयांची लाच मागितली आणि तडजोडी आणती 800 रुपये लाच स्वीकारली. लाच हातात घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून नदीम अब्दुल चौधरीला ताब्यात घेतले आहे .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुजित बडे ,जावेद शेख, गजानन खरात, शिवलिंग खुळे, गणेश भुजाडे, आदींनी हा छापा मारला. याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172