दगडफेक केल्याची खोटी तक्रार; गुन्हा दाखल
जालना- नवीन जालना भागातील वल्ली मामू दर्गा परिसरात दगडफेक केल्याची खोटी तक्रार डायल वन वन टू वरून पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा प्रकार खोटा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 13 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वली मामू दर्गा परिसरातून शेख नईम शेख लाला व 34 वर्ष याने वन वन टू डायल करून दर्ग्यावर दगडफेक होत असल्याची तक्रार केली होती .या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आपल्या पथकासह वली मामू दर्गा गाठला आणि परिस्थितीची शहानिशा केल्यानंतर तिथे असा काही प्रकार घडलाच नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान तक्रारदाराने दर्ग्यामध्ये आपण लाईट बसवताना दगडफेक झाल्याचे म्हटले आहे .ही दगडफेक युसेफ शांतीलाल मिसाळ व 22 वर्ष याने केलीअसल्याचे सांगितले. दरम्यान या संदर्भात युसेफ मिसाळची चौकशी करण्यात आल्यानंतर शेख नईम शेख लाला हा आपल्याला दारू पिण्यासाठी त्रास देत होता आणि त्यामधूनच त्याने ही तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी सर्व शांतता असल्यामुळे ही तक्रार जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केल्याचे पोलिसांचे निदर्शनास आल्यामुळे शेख नईम शेख लाला यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172