Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

छ.शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र इंग्रजांनी लिहिले;सहिष्णुतेमुळे हिंदू धर्माची वाट लागली;आज भारतामध्ये 40 हजार मंदिरांच्या जागी मज्जिद बांधल्या- राहुल सोलापूरकर

जालना- छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र इंग्रजांनी लिहिले कारण आपल्याकडे मौखिक पद्धतीवर भर दिला जातो ,लिखित पद्धतीला दुय्यम स्थान आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत देखील इतिहासाची दुरावस्था आहे .पर्यायाने शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र इंग्रजांनी लिहून ठेवले होते आणि त्यानंतर ते आपल्याकडे आयात करून विस्तारित करण्यात आले, तसेच हिंदू धर्माची वाट “सहिष्णू” या एका शब्दानेच लावली आहे. असे परखड मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतातील 40,000 मंदिरांच्या ठिकाणी आज मज्जिद उभी आहे.

जनजागृती मंडळ जालना ,सम्यक परिवार आणि सांस्कृतिक वार्तापत्र यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त “लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा” या कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे .इ .एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री सांस्कृतिक वार्ता पत्राच्या व्यवस्थापिका सौ.सुनीता पेंढारकर प्राध्यापक सुरेश केसापूरकर यांची उपस्थिती होती. सविस्तर भाषण ऐकण्यासाठी व्हिडिओ पहा

पुढे बोलताना राहुल सोलापूरकर म्हणाले की, आत्तापर्यंत जेवढे निजाम झाले त्या सर्व निजामांच्या विरोधात उठाव केले गेले आणि त्या सर्व प्रयत्नांना चिरडण्याचेही प्रयत्न झाले आहेत. हा सर्व इतिहास नवीन पिढीसमोर आला पाहिजे. खरे तर मराठ्यांना मुक्ती संग्रामाचा खरा इतिहासच माहित नाही .असा आरोपही त्यांनी केला. सिनेसृष्टीमध्ये कौतुक करताना अकबराची बायको जोधा हिचे कौतुक केले जाते ,खरे तर ती अकबराची 23 वी बायको होती. मग तिचे कशाला कौतुक? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासोबत हुमायुन , बाबर, अकबर पासून  औरंगजेबापर्यंतच्या सर्व मुघलांनी हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधल्या आणि आज भारतामध्ये आशा 40,000 मंदिरांची जागा मशिदीने घेतली असल्याची माहिती देखील राहुल सोलापूरकर यांनी दिली.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button