प्रतिष्ठानगरी( पैठण)- आजचे पैठण म्हणजे पूर्वीची प्रतिष्ठा नगरी. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची कर्म आणि जन्मभूमी असलेलं गोदातीरी वसलेले पैठण. रखरखत्या उन्हाळ्यात आजही गोदातीरी वारकऱ्यांचे असलेले मोठे मंडप वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातात. आणि नाथांच्या पायी माथा टेकवल्यानंतर एक वेगळीच अनुभूती या वारकऱ्यांना येते त्यामुळे कोसो दूर चा प्रवास करून इथे आल्यावर नाथांचे दर्शन घेतल्यावर त्यांना कोणतेही भान राहत नाही. संत एकनाथ महाराज यांच्या घराण्याचे तेरावे वंशज मेघश्याम गोसावी यांच्याकडून घेतलेली सर्व माहिती फक्त आपल्यासाठी खालील व्हिडिओमध्ये.
याच पैठण नगरीत नाथांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यासोबत भक्ताच्या सेवेसाठी स्वतः पांडुरंगाने इथं पाणी भरल्याची आख्यायिका देखील आहे आणि त्याचा पुरावा म्हणून आजही इथे सुमारे वीस फूट खोल नाथांच्या काळातील रांजण आहे हे रांजण भरण्याची देखील वेगळीच परंपरा आहे. आषाढी एकादशीला याच नाथांच्या मंदिरातून पंढरपूरला पादुका जातात. या परंपरेत प्रमाणे इतर अनेक परंपरा या पैठण नगरीत आजही सुरू आहेत. श्रीक्षेत्र पैठण नगरीचा हा इतिहास www.edtvjalna.com या वेबसाईटवर तसेच edtv jalna या यूट्यूब चैनल वरून नवीन पिढीला दाखविण्याचा हा प्रयत्न.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.