जालना- जालना शहरातून वाहणाऱ्या सीना नदीमध्ये भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. या रस्त्या संदर्भात सामाजिक संस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर टाकलेला भराव आता काढून घेण्यात येत आहे .नदीपात्रही स्वच्छ होत आहे. दरम्यान या कामाची जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज संयुक्त पाहणी केली. सामाजिक संस्थांसह शहरातील सर्वच स्तरातून जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेवर दबाव येत होता. त्या दबावापुढे महानगरपालिकेला हे काम करावे लागले .त्यामुळे संस्थेच्या जालनेकरांच्या लढ्याला यश आल्याचं बोललं जात आहे.

सीना नदी मधील अतिक्रमणाप्रमाणेच कुंडलिका नदीत पात्रताही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत.  या संदर्भात मागील महिन्यामध्ये समस्त महाजन ट्रस्टच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले होते. त्या उपोषणानंतर महानगरपालिकेने हालचाली करत काही अतिक्रमणे काढली .परंतु काही मोठ्या अतिक्रमणांसंदर्भात नगर रचना विभाग आणि इतर विभागांची ही मदत लागत असल्यामुळे विलंब होत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version