जालना- शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे दैनंदिन काम करत असताना येणारा कंटाळा, रटाळपणा घालून त्यांना अपडेट करून “स्मार्ट” कर्मचारी करण्यासाठी शासनाने पाच दिवसांचा एक कार्यक्रम आखला आहे.  या कार्यक्रमादरम्यान शासनाच्या कोणत्याही विभागातला अधिकारी, कर्मचारी “स्मार्ट” बनण्याचे प्रशिक्षण घेऊ शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह (Maha tech Learning week)हा दिनांक पाच ते नऊ मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताह दरम्यान शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये गतिमानता व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची माहिती प्रदान करणे तसेच कार्यालयीन कामकाज व वैयक्तिक आरोग्याचा योग्य तो समतोल राखण्याबद्दल तज्ञांकडून मार्गदर्शन करण्याचे नियोजन केले आहे .या नियोजनानुसार वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे व्याख्याते, वरिष्ठ पातळीवरील अधिकारी मंत्रालयात व्याख्यान देणार आहेत आणि हे सर्व व्याख्यान शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी प्रभावी व तणावमुक्त जीवनशैली यासंदर्भात प्रभू गौर गोपालदास यांचे व्याख्यान पाहिले. सभागृहात जरी अत्यल्प अधिकारी कर्मचारी वर्ग दिसला तरी प्रत्येकाच्या मोबाईलवर हे पाहता येणे शक्य असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या टेबलवर बसूनच स्मार्ट बनण्याचा प्रयत्न केला.

पाच दिवसांच्या सप्ताहामध्ये शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे राबवावे? सायबर सुरक्षा, स्मार्ट बैठक आयोजित करणे, आरोग्यदायी जीवनशैली, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवनसंगीत ,ध्यान व आंतरिक शांती, आदी विषयांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version