जालना
पोलिस प्रशासनाच्या वतीने आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.दोनशे बॅग रक्तसाठा जमा होईल अशी अपेक्षा पोलिसांना होती,त्या पैकी 166 बॅग रक्त साठा जमा झाला आहे.


सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे, आणि रक्ताचा तुटवडा भासत आहे ,अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्या नागरिकांनी covid-19लस घेतली आहे अशांना रक्तदान ही करता येत. नाही आणि ज्या नागरिकांना कोरोना आजार झाला होता अशा रुग्णांचे रक्तदान देखील घेता येत नाही. अशा विचित्र परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने रक्त साठा जमा करण्याचा हा एक प्रयत्न होता. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपाधीक्षक सुधिर खिरडकर, यांच्या उपस्थितीत हे रक्तदान शिबिर पार पडलं. कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानही करण्यात आला.
Share.

Comments are closed.

Exit mobile version