जालना- 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन (IASP) या जागतिक आरोग्य संघटने या दिनाला मान्यता दिली आहे .त्यामुळे हा दिवस वर्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे(wspd) म्हणजेच जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सुमारे 60 देशांमध्ये हा उपक्रम राबविला जातो. 10 सप्टेंबर 2003 मध्ये स्टॉकहोम येथे पहिला दिवस साजरा केला गेला .हा दिवस म्हणजे धोक्यात असलेल्या जीवांना वाचविण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी निश्चित करणे आणि ते आपल्याला शक्य आहे ते आपण केले पाहिजे याची जाणीव करून देणारा हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे.
जालना जिल्ह्यामध्ये 10 सप्टेंबर 2024 ते 10 सप्टेंबर 2025 या दरम्यान एकूण 81 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी 32 आत्महत्या ह्या सन 2024 मध्ये केल्या तर 49 आत्महत्या या सन 2025 मध्ये केलेlल्या आहेत .ही आकडेवारी फक्त शेतकरी आत्महत्येची आहे .याशिवाय हुंडाबळी, संसाराला कंटाळलेले ,आजाराला कंटाळलेले ,वेगवेगळ्या त्रासांना कंटाळून आत्महत्या केलेल्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे .दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आत्महत्येचे कारण जर शेती असेल तर त्यांच्या वारसांना शासनाकडून मदतही दिल्या जाते. अशा एकूण 17 शेतकऱ्यांना सन 2025 मध्ये शासनातर्फे मदत दिल्या गेली आहे. आजच्या या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने आपणही धोक्यात असलेल्या जीवांना वाचविण्यासाठी प्रयत्न करूयात.
दिलीप पोहनेरकर,9422219172