जालना
जालन्यातील एका व्यापाऱ्याने पुणे येथील नातेवाईकांना चार लाख रुपये पाठविण्यासाठी नोकरकडे दिले होते. मात्र ही रक्कम पुण्याला तर गेलीच नाही चोरट्यांनी मात्र लांबविली आहे. याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रामलाल मोतीलाल परमार यांचा माऊली स्टील सेंटर या नावाने व्यवसाय आहे. काल दिनांक 29 रोजी त्यांनी त्यांचा नोकर अजय लांडगे याच्याकडे चार लाख रुपये (पाचशे रुपयांच्या आठशे नोटा) दिले आणि पुणे येथे नातेवाईकांना देण्यास सांगितले. त्यासाठी लांडगे हा संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास किरण पेट्रोल पंपाच्या बाजूला जेथून ट्रॅव्हल्स जातात तिथे गेला आणि काही क्षणातच मोटर सायकल वरून तिघे जण आले आणि लांडगे जवळील बॅग हिसकावून बसस्थानकाकडे पळाले. याप्रकरणी परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदंनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पर्यंत या चोरांचा तपास लागला नाही.

Share.

Comments are closed.

Exit mobile version