जालना- मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उपक्रमांतर्गत कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या सागर भगवान पुरी, राहणार योगेश नगर अंबड रोड जालना याने प्रशिक्षणाचा कालावधी संपताच दुसऱ्याच दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात चोरी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. दरम्यान तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आणि एका भाजपा आमदाराने केलेल्या पत्रव्यवहारांसंदर्भात आवक जावक रजिस्टर मधील नोंदिचे फोटो त्याने काढले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणाला अडकवण्यासाठी ही जोखीम पत्करून त्याने हा खटाटोप केला आहे हे लवकरच पुढे येईल. पोलिसांनी त्याच्याकडून भ्रमणध्वनी जप्त केला आहे परंतु त्यामधील काही मॅटर त्याने डिलीट केले आहे.
सागर भगवान पुरी राहणार योगेश नगर ,अंबर रोड हा रात्री दहा वाजेच्या सुमारास एका चार चाकी मधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला. त्याचा एक सहकारी खाली वाहनातच बसला आणि सागर याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केला. दालनाच्या बाजूलाच अग्निशमन यंत्र बसवलेले आहे आणि नेहमीप्रमाणेच या दालनाची किल्ली या अग्निशमन यंत्रालाल अडकवलेली होती. त्याने ती काढून दालनात प्रवेश केला आणि सुमारे 15 मिनिट संचिकांची उलथापालत केली त्यासोबत आवक जावक रजिस्टर मधील महत्त्वाच्या पानाचे छायाचित्रही त्यांनी काढले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे .मुळात हा प्रकार उघडकीस आला कसा? हा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना रात्री दहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने फोन करून कोणीतरी व्यक्ती तुमच्या कार्यालयात गेला असल्याची माहिती दिली. या माहितीची खात्री करेपर्यंत सागर पुरी हा कार्यालयातून गायब झालेला होता .दरम्यान काल दिनांक दहा रोजी कार्यालय उघडल्यानंतर सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा ची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रथमदर्शनी सागर पुरी याने काढलेल्या छायाचित्रांवरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आलेल्या कला केंद्रांच्या परवानग्यासाठींची तसेच भाजपाच्या एका आमदाराच्या पत्रव्यवहारासंदर्भात असलेल्या आवकजावक पत्रांच्या नोंदी तो घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच की काय काल दिवसभर राजकीय पुढार्यांचे दबाव प्रशासनावर येत होते. परंतु प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक तथा महसूल सहाय्यक राहुल रवींद्र देशपांडे यांना दिलेल्या अधिकारावरून तालुका पोलीस ठाण्यामध्ये शासकीय गुपिते अधिनियम 1923 कलम पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमानुसार संबंधित आरोपीला तीन वर्षे ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच या प्रकरणाचा तपासी अधिकारी कधीही अशा आरोपीच्या घराची झडती घेऊ शकतो .कारण हे कलम शिस्तभंग तसेच शासकीय संपत्ती व गोपनीयतेचा भंग केल्याचे आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२