जालना – जिल्ह्यातील अंबड येथील फैसलाबाद कॉलनीमधील कु. इकरा अमजद शेख या मुलीला दि.12 जानेवारी 2025 रोजी अंदाजे दुपारी 3.30 वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवुन नेले आहे. त्यावेळी बालिकेचे वय 3 वर्ष 1 महिना असे होते. या बालिकेविषयीची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस दलाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस निरीक्षक अंजली राजपुत यांनी दिली आहे.
कु. इकरा नावाची बालिका हरवल्याची अमजद हाजी शेख यांनी फिर्याद दिल्यावरुन अंबड पोलिस ठाण्यात गु.र.प.22/2025 कलम 137(2) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेच्या दिवसापासून बालिका ही अद्यापपर्यंत आढळुन आलेली नाही. सद्यस्थितीत या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), जालना यांच्याकडून करण्यात येत आहे. कु. इकरा हीचा शरीर बांधा सडपातळ असून उंची 2.5 फुट आहे. चेहरा गोल, रंग सावळा असून काळे कुरळे केस आहेत. तिला हिंदी भाषेतील काही शब्द बोलता येतात. अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक असून तिची मन:स्थिती चांगली आहे. तरी या वर्णनाची बालिका आढळुन आल्यास सीआयडीच्या पोलिस निरीक्षक अंजली राजपुत (मो.8625853786) यांच्याशी संपर्क साधावा. बालिका अथवा तिला पळविणाऱ्या इसमाविषयी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com