जालना- तुम्ही रिल्स बनवण्यात तरबेज आहात आणि तुम्हाला छंदही आहे तर तुम्हाला मिळू शकतात हजारो रुपयांची बक्षिसे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे आणि या अभियानाविषयी बनवणाऱ्यांसाठी विशेष स्पर्धा घेतली जात आहे तर तुम्हीही पहा नशीब आजमावून.

1) रिल्सचा विषय हा (अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण) या दिलेल्या दोन विषयांशीच संबंधीत असावा.2) सदर रिल्स स्पर्धेचा प्रवेश मोफत असेल. सदर रिल्स स्पर्धा ही महाराष्ट्रातील सर्वांसाठी खुली आहे.3) आपली रिल्स ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेपैकी एका भाषेत असणे आवश्यक आहे.4) रिल्स मध्ये अश्लीलता किंवा विभत्स्य कृत्य अथवा क्रूरता, किळसवने प्रसंग यामध्ये टाकता येणार नाही. याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. तसेच रिल्स मध्ये दाखवलेले प्रसंग हे सेंन्सॉरच्या अधिनियमानुसार असणे आवश्यक आहे.5) रिल्स सादरीकरणाची एकुण वेळ हि 30 सेंकद ते 180 सेंकदा (3 मिनिट) पर्यंत असणे आवश्यक आहे. प्रवेशीक जमा करण्याची अंतीम तारीख दि.10/11/2025 रोजी पर्यंत असेल. आपल्या रिल्सची प्रवेशीका 9021701000 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करुन PDF स्वरुपात माहीती मागवुन भरुन देणे आवश्यक आहे. आपली रिल्स ही जालना jaina policereels@gmail.com या इमेल आयडी वर पाठवावे.
6) रिल्स मध्ये वापरलेली सामग्री ही स्वतःच्या मालकीची किंवा परवाना धारक असणे आवश्यक आहे.7) स्पर्धाकांनी प्रवेश फॉर्म भरल्यानंतर आमच्या इमेल आयटीवर रिल्स पाठवल्यानंतर Whatsapp ग्रुप जाईंन करावा.
8) रिल्स मध्ये कोणतेही कॉपीराईट लोकेशन, प्रसंग, संगीत साहीत्य वापरलेले नसावेत. तसेच रिल्स ही कॉपीराईट केलेली नसावी.9) रिल्स ही स्पर्धेसाठी नवीन असणे आवश्यक आहे. तसेच रिल्स ही सोशल मिडीयावर टाकलेली नसावी.10) रिल्स स्पर्धा ही दि. 27/10/2025 पासून सुरुवात होईल. व दि.10/11/2025 पर्यंत आपली प्रवेशीका दिलेल्या नंबर वर भरुन पाठवावी. व आपली रिल दिलेल्या इमेल आय डी वर पाठवावी.
11) सर्व स्पर्धकांनी पाठवलेल्या रिल्स पैकी आक्षेपार्ह वगळुन बाकी सर्व रिल्स दि. 07.11.2025 रोजी आयोजकांच्या परवानगीने स्पर्धकांनी आपल्या आयडीवरुन spjalna या इन्स्टा आयडीला Collaboration करुन अपलोड करणे बंधनकारक राहिल.12) स्पर्धेचा कालावधी दि.12.11.2025 रोजी सकाळी 11 वाजेपासुन ते दि.25.11.2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत निवड प्रक्रिया.13) सर्वाधिक लाईक प्राप्त झालेल्या रिल्सला प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात येईल व त्यानंतर सर्वाधिक व्दितीय विजेता हा त्यापेक्षा कमी लाईक्स असलेल्या रिल्सला ठरेल तसेच या व्यतिरिक्त अंमली पदार्थ व इतर पदार्थाचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या दोन्ही विषयांवरती वेग वेगळे
14) परिक्षकांनी निवडलेल्या रिल्याचा निकाल हा अंतिम व बंधनकारक राहिल.15) रिल्स स्पर्धेचे पारितोषिक पुढील प्रमाणे
1. प्रथम पारितोषिक – सर्वाधिक लाईक्स रु 15000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, 2. व्दितीय पारितोषिक – सर्वात व्दितीय लाईक्स रु 10000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, 3. बेस्ट रिल्स महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण या विषयावरिल सर्वात्कृष्ठ रिल्स रु.10000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह 4. बेस्ट रिल्स- अंमली पदार्थ दुष्परिणाम या विषयावरिल सर्वात्कृष्ठ रिल्स रु. 10000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह16) दि.18.11.2025 रोजी पारितोषिक वितरण सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना येथील प्रशिक्षण कक्ष येथे संपन्न होईल.
जालना पोलीस दलातर्फे महाराष्ट्रातील सर्व जनतेला, रिल्स स्टारला व सर्व विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन करण्यात येते की वरील विषयांवर रिल्स तयार करुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घेवुन सुरक्षित महिला व व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी मदत करावी असे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-दिलीप पोहनेरकर,9422219172
व्हिडिओ आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
https://youtube.com/@edtvjalna5167?si=29V9wLyewR4uPdKh