जालना

जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक मे या कामगार दिनाच्या औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कदीम जालना पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या “आशा सभागृहांमध्ये” हे रक्तदान शिबिर होणार आहे .या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्त साठा करण्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शेळके, हे प्रयत्न करीत आहेत.
1 मे रोजी दिवसभर हे रक्तदान शिबिर सुरू राहणार आहे. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून आरोग्य विभाग आणि सामान्य जनतेच्या रक्षणासाठी मदत करावी असे आवाहन कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे.

Share.

Comments are closed.

Exit mobile version