जालना- जालना शहरात मोकाट कुत्र्यांनी एका सात वर्षाच्या मुलीवर हल्ला करून लचके तोडले यामध्ये या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये मंगळवार दिनांक 6 रोजी घडली.

संध्या प्रभुदास पाटोळे ही मुलगी सकाळी घरासमोर खेळत असताना याच परिसरातील चार पाच मोकाट कुत्र्यांनी या मुलीवर हल्ला केला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. जालना शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील शहरात अशा घटना घडल्या आहेत आणि दोन महिन्यांपूर्वीच अशाच बालकावर कुत्र्यांनी हल्ला केला होता .परंतु सुदैवाने तो बचावला या संदर्भात दिनांक 22 एप्रिल रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ .श्रीकृष्ण पांचाळ यांना Ed Tv News  ने सविस्तर माहिती दिली होती . असे असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version