जालना -श्रीराम वनवासात असताना जालना तालुक्यातील नेर- सेवली भागामध्ये असलेल्या डोंगर रांगांवर शेती करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळी नांगराची फळा जमिनीमध्ये अडकून राहिली .त्यामुळे अर्धवट शेती सोडून श्रीरामांना पुढे सरकावे लागले आणि कदाचित यामुळे या ठिकाणाला नांगरतास असे म्हणत असावे असे सांगितले जाते.

जालनेकरांचे श्रद्धास्थान  या मालिकेचे आठव्या भागांमध्ये शंभू महादेव या शिवालया ची माहिती तेथील महंतांनी दिली, आणि ही माहिती देत असतानाच या नांगरतासचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्या ठिकाणापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर हे नांगर्तास आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगर-दऱ्या मधून नागमोडी पक्का रस्ता आहे .त्यामुळे सर्व वाहने थेट या मंदिरा पर्यंत पोहोचू शकतात.

मंदिरात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूला दिसणारी हिरवीगार झाडे मनाला ताजेतवाने करतात, पुरातन मंदिर असल्यामुळे निश्चितच येथील बहुतांशी बांधकाम हे दगडांमध्ये आहे.

मोठमोठे वटवृक्ष, त्यावर मुक्तपणे वावरणारी वानरे ,पक्षांचा किलबिलाट , ओढ्यामधून वाहणारे झुळझुळ पाणी आणि वटवृक्षाला असलेल्या पारंब्या ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे आणि याचा फायदा जर आलेल्या भाविकांनी घेतला नाही तर नवलच! पुरातन महादेवाच्या मंदिरा मध्ये पिंडीवर फना काढून उभा असलेला नाग आणि पिंडी भोवती केलेली फुलांची आरास आणि त्या मधून येणारा सुगंध हा भक्तांना येथे बांधून ठेवतो . अशा निसर्गाच्या सानिध्यात हे नांगरतास आहे .येथील महंत देखील कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने आणि निसर्गाला प्रतिसाद देत गवता पासून तयार केलेल्या एका झोपडीमध्ये राहतात. शहरी भागापासून दूर आणि हिरवळीत लपलेली ही मंदिरे प्रदूषणापासून मुक्त असल्यामुळे की काय? भाविकांना इथे येण्यासाठी वारंवार प्रोत्साहित करतात. परंतु गेल्या दीड वर्षांपासून covid-19 चा काळ असल्यामुळे या भागातील भक्तांची वर्दळ कमी झाली आहे .आणि याचा परिणाम उत्पन्नावर तर झालाच आहे .सध्या श्रावणाचा महिना सुरू आहे आणि भाविक देखील इथे वाढायला लागले आहेत. त्यामुळे कदाचित गेल्या दीड वर्षांपासून उत्पन्नामध्ये झालेली घट पूर्णपणे तर भरून निघणार नाही मात्र काही अंशी का होईना पुढील खर्चासाठी हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna

www. edtv jalna. com, 9422219172

 

Share.

Comments are closed.

Exit mobile version