जालना- आयुष्यात गुणात्मक बदल घडविण्यास शिक्षण व्यवस्था कमी पडली म्हणूनच भारतात उच्च शिक्षणासाठी सर्व सुविधा असतांना सुद्धा विद्यार्थी परदेशात का जातात ? अमेरिकेत दहा लाखांपैकी तीन लाख 37 हजार भारतीय विद्यार्थी असून भारतातील पालकांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी 39 हजार कोटींचं कर्ज घेतलं आहे.असेच चालू राहिले तर पुढील दहा वर्षात भयानक परिस्थिती निर्माण होईल. याचा गांभीर्याने विचार करून प्राध्यापकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी केले.

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, उच्च शिक्षा वर्ग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने रविवारी (ता .01)देवगिरी पतसंस्थेच्या सभागृहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्रिवार्षिक संगठण आराखडा निर्मिती कार्यशाळेचे उद्दघाटन माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर हे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र सेवा प्रमुख प्रो. डॉ.उपेन्द्र कुलकर्णी, शैक्षिक महासंघाचे प्रदेश महामंत्री तथा विद्यापीठ अध्यक्ष प्रो. दिलीप अर्जुने, डॉ. वैभव नरवडे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी अन्य राज्यांत शैक्षणिक धोरणाबाबत केवळ औपचारिकता असून महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात नवीन पायंडा निर्माण करणारा आहे. राज्यात नवीन प्रयोग राबवावे लागतील, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे एन. इ. पी. च्या अंमलबजावणीसाठी राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती देवळाणकर यांनी दिली.

डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, भारताच्या वैभवशाली शैक्षणिक पध्दतीचे पुर्नस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असून समाज व राष्ट्राची गरज आहे . या दृष्टीने पाहावे, त्यातून नाविन्य घडेल असे नमूद करत अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी मनापासून मानसिकता स्वीकारावी तरच राष्ट्र परिवर्तन होईल असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. प्रदीप खेडकर यांनी देशहितासाठी शैक्षिक महासंघ कार्य करत असल्याची माहिती दिली.

प्रास्ताविकात प्रो. डॉ. दिलीप अर्जुने यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापक ,संस्थाचालकांचे प्रश्न प्रशासनाच्या समन्वयाने सोडविण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. डॉ. रेखा मग्गीरवार, डॉ. मिनल भोंडे यांनी सरस्वती वंदना, संगठन गीत गाईले. सुत्रसंचालन डॉ. संजय जगताप यांनी केले तर महामंत्री डॉ. सत्यप्रेम घुमरे यांनी आभार मानले. कार्यशाळेत राज्यभरातील प्राधिकरणाच्या 104 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. डॉ. एम. जी. हिंगे, डॉ. बी. डी. तोटरे, डॉ. गजानन देशमुख, डॉ. पी. बी. चंदनशिवे, प्रा. सतीश लोंढे, डॉ. महानंदा दळवी, डॉ.संजय संबळकर, प्रा. प्रदीप हैतनकर,डॉ. दिनेश खेडकर,डॉ. डि. बी. पवार, डॉ.शशिकांत काळे डॉ. मृणाल तांबे ,डॉ.नितीन बारी, डॉ.ज्ञानोबा मुंडे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

परिसंवादात तज्ञांचे मार्गदर्शन..!उद्घाटन सत्रानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , 2025 ते 2029 शैक्षणिक आराखडा, संघटना व प्राधिकरण समन्वय, अशा विविध विषयांवर सत्रांमध्ये प्रो.डॉ.उपेन्द्र कुलकर्णी, डॉ. कल्पना पांडे, यांनी मार्गदर्शन केले.

https://youtube.com/@edtvjalna5167
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version