जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची इमारत बांधण्यात आली आहे .

परंतु या इमारत कडे जाण्यासाठी रस्ताच नाही .पावसाळ्यात उड्या मारत जावे लागते तर अन्यवेळी रस्त्यातील काटे- कुपाट्या आणि मुरमाचा ढीग तुडवीत जावे लागते. यासंदर्भात या कार्यालयाने जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिनांक 20 मार्च रोजी पत्र देऊन रस्ता देण्याची मागणी केली .परंतु याच्यावर विचार झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील “तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो” असं करत दिनांक 20 मे रोजी जालना महानगरपालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन दिनांक दोन जून रोजी या रस्त्यासाठी उपोषणाला बसणारे सामाजिक कार्यकर्ते तथा विविध धर्मावत यांना उपोषणापासून परावृत्त करावे अशा सूचना केल्या .तरी देखील या कार्यालयांना घाम फुटला नाही शेवटी आज विधीज्ञ महेश धनावत यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची तरी दखल शासकीय अधिकारी घेतील का हे आता पाहावे लागेल.

https://edtvjalna.com/archives/16032FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==

follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa

दिलीप पोहनेरकर -९४२२२१९१७२

 

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version