जालना- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आयएएस(IAS )अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. चुकीची धंदे, चुकीचे व्यवसाय, भेसळ करणाऱ्या व्यवसायिकांशिवाय इतर कोणालाही त्यांचा राग नाही. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन केलेले बॅनर जालन्यातही जालनेकारांनी लावले आहे. कारण 2011 मध्ये याच जालन्यातील बडे हस्तीनी तुकाराम मुंडे यांची अवघ्या 11 महिन्यांमध्ये बदली करायला प्रशासनाला भाग पाडले होते.

<span;> हे सर्व सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच एखाद्या अधिकाऱ्याने जर ठरवले की समाजासाठी आपल्याला जटायचेआहे. ती आपली जबाबदारी आहे, त्यासाठीच आपण जीवाचे रान करून रात्रंदिवस अभ्यास करून रक्ताचे पाणी करून एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलो आहोत. तर तो काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे. खरंतर जेवढे अधिकार तुकाराम मुंढे यांना आहेत तेवढेच अधिकार सर्व आयएएस अधिकाऱ्यांना आहेत. मग पाणी कुठे मुरते हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.मराठीमध्ये एक म्हण आहे “पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा”. कदाचित रक्ताचे पाणी करून ज्या कामासाठी तुकाराम मुंढे आयएएस झाले ते काम आता फळाला येताना दिसत आहे.
त्यांच्या या कामाचा जालनेकरांना काय फायदा झाला? तर निश्चितच तुकाराम मुंढे जरी जालन्यात नाही आले तरी त्यांच्या प्रशासनाने कधी नव्हते ते काम केले आहे. या कामांमध्ये एप्रिल 26 ते आतापर्यंत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या प्रतिष्ठानांना भेटी देऊन 125 तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 71 प्रतिष्ठांनाना सुधारणा करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. दहा प्रतिष्ठानाला काही त्रुटी आढळल्यामुळे साठ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आणि एकूण 94 अन्न नमुने घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दूध 27, आईस्क्रीम चार, मसाले सात, पनीर नऊ , तेल 9, तूप 10, बदाम शेक1, लस्सी दोन, दही एक ,बडीशेप दोन, एनर्जी ड्रिंक पाच, आंबे तीन, डाळी दोन, मिठाई एक, आणि बॉटल बंद पाणी एक व इतर दहा असा समावेश आहे.
<span;>तेरा प्रकरणांमध्ये 84 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .तपासणीसाठी घेतलेल्या 94 नमुन्यांपैकी 38 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल अन्न व औषधी प्रशासनाला प्राप्त झाले आहेत, त्यापैकी सहा नमुने हे असुरक्षित म्हणजे हानिकारक आहेत. तीन नमुने हे आवश्यक असणाऱ्या दर्जा पेक्षा कमी दर्जाचे आहेत ,पाच नमुने हे बनावट आहेत. तर 24 नमुने हे ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आहेत. आणि 56 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. जुलैपासून शासकीय व खाजगी शाळांची, वस्तीगृहाची तपासणी सुरू झाली असून नऊ तपासण्या करण्यात आल्या आहेत.
<span;>विशेष म्हणजे आत्तापर्यंत या कार्यालयाचे जसे काम सुरू होते तसेच आजही सुरू आहे. परंतु काम करणाऱ्यांची इच्छा जर असेल तर ते होते .हे पुढील पदावरून लक्षात येईल. सध्या अन्न व औषधी प्रशासनाकडे अन्नसुरक्षा अधिकारी यांची चार पदे मंजूर आहेत त्यापैकी एक पद रिक्त आहे. औषध निरक्षक यांची दोन पदे मंजूर आहेत आणि दोन्ही रिक्त आहेत त्यामुळे आत्तापर्यंत अधिकारी नाहीत कर्मचारी नाहीत असे म्हणत काम टाळणाऱ्या या अन्न व औषध प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी खमक्या आल्यामुळे कामाला सुरुवात केली आहे.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172