जालना- शिक्षण संस्थेच्या तक्रारी करून संस्थाचालकांशी संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रयत्न केला.परंतु तो फसला. संस्था चालकांचा काटा काढण्याची धमकी देणाऱ्या खंडणीबहादरांविरुद्ध चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तीन आरोपींना अटकही केले आहे.
यासंदर्भात रवी प्रदीप खोमणे वय 36 वर्ष व्यवसाय संस्था चालक राहणार जुना जालना यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे”, की त्यांची दीप शोभा सेवाभावी संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून जालना तालुक्यातील नाव्हा येथे एस. के. कॉलेज सुरू आहे. या कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रम चालवले जातात. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्यासोबत बाळू प्रभाकर दांडगे, यज्ञेश्वर बाबुराव हिवरेकर ,अनंत अनिरुद्ध मोहिते, शिवम राजेंद्र जयस्वाल ,प्रदीप सुधाकर सातोणकर, गणेश नळगे यांचे देखील मराठवाड्यात महाविद्यालये आहेत .सुमारे एक जून 2025 रोजी संस्थाचालक अनंत मोहिते यांच्या मोबाईलवर करण विलास निकाळजे याने फोन करून तुम्ही संस्थाचालक सीनियर कॉलेजमध्ये समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांचे पैसे खाता, त्यांचे अनुदान लुबाडता असे बोलून महाविद्यालय बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या .त्यानंतर या संदर्भात दिनांक 3 जून रोजी संध्याकाळी वाटूर येथे सर्व संस्था चालकांची बैठक झाली. तिथे करण विलास निकाळजे याला बोलावून घेतले .त्यावेळी करण एकटाच आला होता. चर्चा करत असताना करणं याने तक्रार मागे घेण्यासाठी पैशाची मागणी केली, आणि कमरेची बंदूक टेबलवर ठेवली . त्यावेळी आम्ही सर्वजण घाबरलो तक्रार मागे घ्यायचे असेल तर मला पैसे द्या नाहीतर काटाच काढतो अशी धमकी दिल्यामुळे सात संस्था चालकांनी प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. तसेच बाळू दांडगे यांनी पाच लाखांचा धनादेश दिला जो दुसऱ्या दिवशी वटवण्यात आला .त्या नंतर करण निकाळजे हा निघून गेला.आणि आता तुम्हाला कोणी त्रास देणार नाही असे सांगितले.
त्यानंतर पुन्हा दिनांक 18 जून 2025 ला सुरेश खंडाळे यांनी करण निकाळजे यांच्याप्रमाणेच समाज कल्याण विभागात दुसरा अर्ज दिला आणि या अर्जासंदर्भात भेटण्यासाठी पुन्हा संस्थाचालक तक्रारदार सुरेश खंडाळे यांना दिनांक 19 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपाहारगृहात भेटलो.तिथे करण निकाळजे देखील सोबतच होता तिथे करणला यापूर्वी झालेल्या व्यवहारा संदर्भात विचारले असता तो म्हणाला की मामाला पैशाची गरज असेल त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे .या संदर्भात आपण उद्या भेटू..त्या बैठकीनंतर पुन्हा दिनांक 20 रोजी छत्रपती छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये पुन्हा भेटण्याचे ठरले .या हॉटेलमध्ये गेल्यानंतर करण निकाळजे याचा भाऊ रुपेश निकाळजे हा बसलेला होता .त्यानंतर सुरेश खंडाळे व त्यांचा मुलगा बंटी उर्फ गौरव खंडाळे तिथे आले आणि प्रत्येकी दहा लाख रुपये द्या अशी एकूण 70 लाख रुपयांची मागणी केली. नाही तर माझा हिसका दाखवतो अशा प्रकारची धमकी दिली अशी तक्रार रवी खोमणे यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 308( 5) अन्वये दिनांक 24 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मध्ये करण विलास निकाळजे सुरेश खंडाळे गौरव उर्फ बंटी खंडाळे रुपेश निकाळजे आणि इतर साथीदारांवर हा गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच करण निकाळजे मयूर निकम निलेश निकाळजे यांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२