छत्रपती संभाजीनगर- 35 वर्ष सेवा केल्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकाचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. गफार सरोवर खान पठाण असं हे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

गफार  पठाण यांनी दिनांक 31 जानेवारी 1990 रोजी औरंगाबाद येथे पोलीस शिपाई म्हणून नोकरीला प्रारंभ केला .त्यानंतर एक सप्टेंबर 2000 मध्ये पोलीस नाईक आणि 22 जानेवारी 2023 रोजी हेड कॉन्स्टेबल या पदावर 18 जून 2015 रोजी पदोन्नती मिळवली. गफार यांनी तडवी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. सदर प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयाने तब्बल तेरा वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये पडताळणीसाठी समितीकडे पाठवले आणि या समितीने 12 वर्ष या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली .28 जुुुलैसन 2025 रोजी  हे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे जानेवारी 2026 मध्ये गफार सरोवर खान हे सेवानिवृत्त होणार आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिनांक 28 जुलै 2025 रोजी या बनावट प्रमाणपत्रासंदर्भातचा सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला आहे. तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 मधील कलम 10 ते 12 अन्वये कारवाई करण्याची शिफारस देखील केली आहे. गफार  खान यांना सेवानिवृत्त होण्यासाठी अवघे सहा महिने उरले आहेत .त्यामुळे मागील 35 वर्षात जे घडलं तेच पुढील सहा महिन्यात जर घडलं तर गफार खान यांची सेवा ही निर्विघ्न पार पडू शकते. परंतु जर पोलीस अधीक्षकांनी मनावर घेतलं आणि कारवाईचा बडगा उगारला तर शेवटच्या टप्प्यात गफारखान यांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान तडवी जातीच्या प्रमाणपत्रासाठी गफार सरोवर खान पठाण यांनी त्यांचे चुलत भाऊ यांचे पुरावे जोडले होते.

                     FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version