परतुर- आर्थिक अडचण सोडवण्यासाठी पत्नीचे झुमके सेलू येथील बँकेत ठेवून परत येणाऱ्या तरुणाचा त्याच्याच सोबतच्या मित्राने खून केल्याची दुर्घटना परतुर तालुक्यातील लिखित पिंपरी येथे बुधवार दिनांक 30 रोजी घडली .या प्रकरणी संशयित आरोपी श्रीराम पांडुरंग दराडे राहणार आडगाव तालुका सेलू हल्ली मुक्काम लिखित पिंपरी याला पोलिसांनी अटक केले आहे.  आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या खुनाची घटना आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि तिथे एक 20 किलोचा दगड, रक्ताचे डाग, प्लास्टिकचे रिकामे ग्लास आणि दारूची बॉटल सापडली .तसेच फॉरेन्सिक तपास यंत्रणेच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी गुप्त माहिती दारा मार्फत लिखित पिंपरीतही शोध घेतला आणि आरोपी गळाला लागला .तो होता श्रीराम पांडुरंग दराडे

आर्थिक अडचण सोडवण्यासाठी लिखित पिंपरी येथील तरुण लक्ष्मण गुलाबराव कदम वय 31 वर्ष हा त्याचा मित्र श्रीराम पांडुरंग दराडे यांच्यासोबत सेलू येथे गेला होता.सेलू येथे एका बँकेत झुमके गहाण ठेवले झुमक्याच्या बदल्यात 33 हजार रुपये मिळाले. सेलूहून परत येताना लक्ष्मण आणि श्रीराम या दोघांनी लिखित पिंपरी शिवारात एका ठिकाणी शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दारू पिली. दारू पिल्यानंतर श्रीराम दराडे याने लक्ष्मण कडे कपडे घेण्यासाठी पैसे मागितले परंतु त्याने नाकार दिला. त्याच वेळी श्रीराम दराडे यांच्या डोक्यात जुना विषय घर करू  लागला जो भांडणाचा होता .या जुन्या भांडणाच्या रागातून त्याने लक्ष्मण कदम झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात 20 किलोचा मोठा दगड घातला आणि त्यातच लक्ष्मण कदम चा मृत्यू झाला. लक्ष्मणचा श्वास बंद झाल्याची खात्री करून श्रीराम हा जवळच असलेल्या लक्ष्मण हिंगे महाराजांच्या मठात पळून गेला .तिथे त्याने कपडे धुऊन काढले आणि लक्ष्मणच्या खिशातून चोरलेले 32500 याच मठातील एका स्नान घरात ठेवले. असल्याची कबुली या प्रकरणातील आरोपी श्रीराम पांडुरंग दराडे यांनी दिली असून चोरलेले पैसेे ही पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.

                     FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version