जालना -मराठीमध्ये एक म्हण आहे “इच्छा तेथे मार्ग”. अशीच कांहीशी परिस्थिती जालना जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात सध्या दिसून येत आहे. जर इच्छा असेल तर अधिकारी वर्ग काहीही करू शकतो ,याचाच हे एक उदाहरण म्हणता येईल .जालना जिल्हा परिषदेमध्ये अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) येऊन गेले परंतु शिक्षणावर भर देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र खूपच कमी अधिकाऱ्यांची नावे आहेत. साधारणतः वीस वर्षांपूर्वी निपुण विनायक या अधिकाऱ्याने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यानंतर 2020 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी देखील विशेष प्रयत्न करून जालना जिल्ह्याचे नावलौकिक करणारी जिल्हा क्रीडा प्रबोधिनी उभारली .आज याच क्रीडा प्रबोधिनी मधून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होत आहेत.

आता नाशिक जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिथे सुपर फिफ्टी हा आयआयटी ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्ग दाखवला. आता त्या जालनाच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत .परंतु हा प्रकल्प राबवायचा असेल तर तो जिल्हा परिषदेमार्फत राबविणे सोपे जाते. कारण शिक्षण यंत्रणा ही सर्व जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करते. त्यामुळेच की काय श्रीमती मित्तल यांच्या खांद्याला खांदा लावून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) श्रीमती पीएम मिनू यांनी देखील हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे आणि याला सुरुवातही झाली आहे. मागील आठवड्यात या संदर्भातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची परीक्षा देखील घेण्यात आली .
या परीक्षेसाठी एकूण 373 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 184 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये NEET साठी 80 तर JEE साठी 104 विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी 25 -25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची आयआयटी साठी तयारी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे या दोन महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील पहिल्या 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे . सविस्तर बातमी वरील व्हिडिओ मध्ये.**************
Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
Web-www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172