जालना/सागर धानुरे याची शनिवारी रात्री नऊ वाजता धारदार शस्त्राने वार करून आणि गावठी कट्ट्यातून गोळी मारून हत्या करण्यात आली होती .रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आणि जालना जिल्ह्यात वाऱ्यासारखे बातमी पसरली. सागरच्या अंगावर चाकूचे वार असल्यामुळे पोलिसांनी ही घटना आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी ठरवून त्या अनुषंगाने तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या बारा तासांमध्ये या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली आहे.
पैशाच्या देवाण-घेवाणी मधून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सागर धानुरे आणि कल्याण भोजने या दोघांमध्ये 25 लाख रुपयांवरून वाद चालू होते. सागरचे कल्याण भोजने कडे पैसे होते आणि सागरने हे पैसे मिळविण्यासाठी तगादा लावला होता. दरम्यानच्या काळात सागर भोजनेला कमलेश झाडीवाले आणि सागर धानुरे यांच्यामध्ये देखील काही कारणावरून वाद असल्याचे समजले आणि या दोघांनी मिळून सागर चा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार कल्याण भोजने यांनी सागर धानोरेला शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अंबड चौफुली भागातील कलावती हॉस्पिटल समोर बोलावले .त्यावेळी सागर धानोरे आणि कमलेश झाडीवाले या दोघांनी चार चाकी मध्ये प्रवेश करून सागर धानुरेच्या गळ्यावर चाकूचे वार आणि गोळी घालून ठार केले चार चाकी वाहनाला काळी काच असल्यामुळे वाहनांमध्ये काय सुरू आहे हे बाहेरून समजलेच नाही. रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आणि स्थानिक गुन्हा(lcb )शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हा केल्याचे दोघांनी कबूल केले आहे .कमलेश झाडे वाले यांनी सागर धानोरे याला पकडले आणि त्याच्या जवळ असलेल्या चाकूने वार केले ही सर्व घटना घडल्यानंतर सागर धानोरे याचा मृत्यू झाल्याची खात्री करून कमलेश झाडीवाली आपल्या राहत्या घरी गेला आणि पुन्हा सागर धानोरे यांच्या घटनास्थळी येऊन इतरांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदनाच्या वेळी देखील उपस्थित राहिला .यातील एक आरोपी कल्याण भोजने हा कमलेश झाडीवाले याला सागर धानुरेचा काटा काढल्यानंतर 25 लाख रुपये देणार होता असेही त्याने सांगितले आहे


कालची बातमी
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,9422219172