जालना- केवळ दिलेले काम पूर्ण करण्यापेक्षा मन लावून केलेल्या कामाचा आनंद काही वेगळाच असतो. असाच एक सकारात्मक अनुभव जालना शहरातील चंदन झिरा भागात असलेल्या कै. नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाला आला आहे. 

सध्या भारताची जनगणना २०२७ सुरू आहे. १६ मे ते १४ जून पर्यंत हे काम चालू राहणार आहे. असे असताना दिलेले काम वेळेत आणि मुदतीपूर्व पूर्ण केल्यामुळे वरील शिक्षण संस्थेतील शिक्षक मिलिंद नारायणराव पंडागळे या प्रगनकाचा जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी सत्कार केला आहे. प्रत्येक प्रगणकाला प्रत्येकाच्या घरी जाऊन वेगवेगळी जनगणना करण्याचे काम दिले गेले आहे. कोणाला 100 आहेत कोणाला 200 आहेत कोणाला 400 आहेत. अशी वेगवेगळी संख्या असताना श्री. पंडागळे यांनी 417 घरांची अचूक  आणि मुदतपूर्व जनगणना करून भारतीय प्रशासन सेवेच्या जालना मनपाच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडून शाबासकी मिळविली आहे.  सहा प्रगणक आणि एक पर्यवेक्षक अशी या जनगणनेची साखळी आहे. मिलिंद पंडागळे यांच्या सहा जणांच्या टीम मध्ये प्रा. गणेश बापूराव गुंजाळ, प्रगती भालेकर, निर्मला जाधव ,रूपाली भामरे ,मोहम्मद कासिम, यांचा समावेश होता. त्यांच्या या सत्कार समारंभाच्या वेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version