बीड- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांना बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विजय चव्हाण यांनी अनेक वेळा वाळूची चोरटी वाहतूक होत असताना कारवाया केल्या होत्या. परंतु दुसऱ्या बाजूला याच वाळू माफियांना हप्ते मागत असल्यामुळे वैतागलेल्या वाळू माफियांनीच तहसीलदारांना लाच देऊन “कार्यक्रम” केला आहे.

स्वतः मोठी कारवाई करत असल्याचा आव आणणारे अंबडचे तहसीलदारच मोठे लाचखोर निघाले. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज शनिवारी सायंकाळी मोठी कारवाई करत तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलंड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी संबंधित तक्रारदाराकडे तब्बल ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. परंतु एकीकडे वाहनांवर कारवाई आणि दुसरीकडे तहसीलदारांचा हप्ता हे दोन्ही शक्य होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानंतर झालेल्या तडजोडीनुसार ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना ACB च्या पथकानेसापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहाथ पकडले.

दरम्यान विजय चव्हाण एकीकडे गोरगरिबांना मदत करण्याचा आवाहन होते तर दुसरीकडे मात्सोदरी  देवी संस्थान च्या जागेवर उभारण्यात येणारा सोलार पॅनल चा प्रकल्प आप्तेष्टांच्या घशात घालण्याचाही प्रयत्न करत होते. परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version