जालना-अलनिनोच्या प्रभावामुळे उद्यापासून सर्व माध्यमांच्या शाळा एकाच सत्रात करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अशीमा मित्तल यांनी जारी केले आहेत. 

राज्यातील मान्सून अलनिनोने प्रभावित झाला आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत पाऊस पडलेला नाही. त्यातच 15 जूनला शाळा देखील सुरू झाल्या आहेत .अशा परिस्थितीमध्ये उन्हाची तीव्रता आणि आरोग्य विषयक समस्या उद्भवू नयेत म्हणून , विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा, सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, तसेच वेगवेगळ्या शाळांचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या शाळांची वेळ ही सकाळी साडेसात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

आजच जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पारित केले आहेत. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कांत कनवारिया यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी देऊन आदेश निर्गमित केले.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version