जालना-सरकारी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे गेल्या 13 वर्षांपासून बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयात चक्कर मारून थकले. शेवटी तहसीलदारांनी न्याय दिला परंतु तो कागदावरच प्रत्यक्षात मात्र अजून ज्या रस्त्यासाठी भांडण चालू होते तो रस्ता मिळालाच नाही. 

बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथे वीज वितरण कंपनीचे 33 केव्ही उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र गट क्रमांक 181 आणि 194 या जागेत आहे. या दोन्ही गटांच्या मधून एक शासन दरबारी अधिकृत रस्ता आहे .परंतु या दोन्ही गटांमधील हा रस्ता न ठेवता वीज वितरण कंपनीने आपले उपकेंद्र उभारले आहे .त्यामुळे गेल्या 13 वर्षांपासून हा शेतकरी शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून तहसीलमध्ये चकरा मारत आहे. या त्याच्या या प्रयत्नाचे फलित असे झाले की जुनी कागदपत्र काढून पाहिल्यानंतर हा अधिकृत रस्ता असल्याचे तहसीलदारांना लक्षात आले आणि त्यानुसार जानेवारी 2026 मध्ये गट क्रमांक 190 ला जाण्यासाठी रस्ता होता हे मान्य करून या गटात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची नोंद सातबारावर घेतल्या गेली. परंतु प्रत्यक्षात मात्र आजही या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठी तहसीलदारांनी दिनांक 19 जून रोजी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना आदेश दिले .

त्यानुसार हे अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले त्यावेळेस ते देखील हतबल झाले. कारण जो रस्ता मोकळा करून द्यायचा होता तिथे वीज वितरण कंपनीचे मोठमोठे रोहित्र बसवलेले आहेत. जोपर्यंत हे रोहित्र इतरत्र हलवले जात नाही तोपर्यंत हा रस्ता देणे कठीण असल्याचा पंचनामा त्यांनी केला. प्रश्न असा उद्भवतो की मग गेल्या 13 वर्षांपासून हे शेतकरी शेतात जात कसे होते?. तर ते शेजारच्या शेतकऱ्यांच्या हाता पाया पडून कशी तरी शेती करत होते. परंतु आता हे शेतकरी देखील जाऊ देण्यास तयार नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या शेतकरी परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला वैतागलेल्या शेतकरी दांपत्याने शेवटी कठोर निर्णय घेतला आहे .ज्या तहसीलदारांनी आमच्या शेतीचा रस्ता वीज कंपनीला अर्पण केला .त्या तहसीलदारांनी 10 जुलै पर्यंत शेतात जाण्यासाठी आम्हाला रस्ता दिला नाही तर आम्ही देखील आमच्या परिवाराचे देह तहसीलदारांना समर्पण करू ,असा इशारा दिला.

दरम्यान परंपरागत असलेला रस्ता विजेच्या रोहितरामुळे देणे शक्य नसेल तर मुख्य रस्त्यापासून वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून पर्यायी आणि कायमस्वरूपी रस्ता असा पर्याय देखील या दांपत्याने सुचवला आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version