जालना- वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येत आठ जणांच्या टोळीने नको तो “उद्योग” केला आणि पोलिसांनी या उद्योगाची उलाढाल तूर्तास वीस लाख रुपये ठरवली आहे.

बदनापूर तालुका आणि परिसरातील काजळा, पानखेडा, ढोकसाळ, रोशनगाव, बदनापूर, वाघ्रळ, दाभाडी, डोंगरगाव, आदी भागांमधील वीज वितरण कंपनीच्या विजेच्या खांबावरील जर्मनच्या तारा तसेच या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या पाण्यावरच्या मोटर चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. या प्रकारामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले होते. मोटार चोरीला जाणे हे एक नुकसान आणि पिकाला वेळेत पाणी न मिळाल्यामुळे घटणारे उत्पादन हे दुसरे नुकसान या प्रकाराला त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी देखील केल्या. परंतु किरकोळ तक्रार आहे असे समजून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तक्रारींची संख्या वाढत गेली आणि ही मोठी टोळी असावी असा पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू  यांनी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले.

त्या अनुषंगाने श्री. सुरवसे यांनी तीन वेगवेगळी पथके स्थापन केली. या पथकांनी मागील पंधरा दिवसांपासून आपले जाळे पसरले. दरम्यानच्या काळात बदनापूर पोलीस ठाण्यात तारा आणि मोटर चोरीचे 13 गुन्हे दाखल झाले. या सर्व प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी अखेर छडा लावला. त्यानुसार ही टोळी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणात एकूण आठ आरोपी निष्पन्न केले. या आठ पैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले आहे आणि त्यांची पोलीस कोठडीतही रवानगी झाली आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून बारा लाख रुपयांचे दोन पिकअप वाहन आणि आठ लाख 14 हजार रुपयांच्या तारा, पाण्याच्या मोटर असा एकूण 20 लाख 14 हजार रुपयांचा बुद्धमाल जप्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये दीपक गणेश शिंदे, राहणार फुलेनगर बदनापूर.विकास भाऊसाहेब मांदळे, मातोश्री नगर बदनापूर. विजय बाबुराव पाखरे, साठे नगर अंबड. संतोष तुकाराम पवार,शेवगा तालुका अंबड .अभिजीत विष्णू गारोळे, नेहरूनगर परभणी. युसूफ खान हनीफ खान राहणार काबरा नगर गारखेडा. यांचा समावेश आहे तर अब्दुल माजीद अब्दुल कदीर राहणार बदनापूर आणि चांदमिर बागवान ,राहणार दाभाडी हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version