जालना- जिल्ह्यात बाहेर राज्यातून येणारा गुटखा काही थांबण्याचे नाव घेत नाही, गेल्या काही महिन्यांपासून जालना जिल्ह्यात पोलीस ठीक- ठिकाणी छापे टाकत आहेत,गुटखा पकडत आहेत .असे असतानाही गुटखा माफीयायांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. आज पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा मारून महाराष्ट्रात विक्रीवर बंदी असलेला वेगवेगळ्या प्रकारचा 95 लाख 50 हजारांचा गुटखा आणि याची वाहतूक करणारा चाळीस लाखांचा ट्रक असा एकूण एक कोटी 35 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या पथकाला जालन्यात गुटखा येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत राजुर ते टेंभुर्णी रस्त्यावर सापळा लावण्यात आला. या सापळ्यानुसार राजूर येथे राहणाऱ्या संदीप भूमकर यांच्या शेतातील गोठ्यावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गुटख्याने भरलेला ट्रक उतरविण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी या पथकाचे प्रमुख अविनाश गडाख, योगेश उबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा मारला. या छाप्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गोवा,विमल,रजनीगंधा आर.एम.डी.राजनिवास आणि अन्य काही प्रकारचे पान मसाले असा एकूण नऊ लाख 50 हजार रुपयांचा गुटखा अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याउपस्थितीत जप्त केला आहे. या मालाची वाहतूक करणारा चाळीस लाखांचा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी संदीप भुमकर राजुर ,आणि आशिष डोलवाणी राहणार बुऱ्हानपूर मध्य प्रदेश या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com