जालना- जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिकांचे नुकसान झाले असले तरी एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे समाधान आहे. त्याचा परिणाम उद्या साजरा होणाऱ्या  बैलपोळा सण साजरा करण्यावर  दिसत आहे.

आज बाजारामध्ये बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होती. साहित्य खरेदी करणाऱ्यासोबतच विक्रेत्यांमध्ये ही आज वाढलेल्या गर्दीमुळे समाधान व्यक्त होत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैशाची आवक कमी झाले आहे, त्यामुळे काटकसर केली जात असल्याचे चित्र आज बाजारात पाहायला मिळाले. भाववाढीचा ही या साहित्य खरेदीवर परिणाम झालेला आहे, मात्र वर्षभर साथ देणाऱ्या बैलांसाठी आजचा हा दिवस  आहे आणि या सणासाठी आपल्या सर्जा- राजा साठी बळीराजा वाटेल तो खर्च करायला तयार आहे. covid-19  नियमांना फाटा देत मामा चौकांमध्ये हे या साहित्य विक्रेते आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version