जालना -जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना पदावर रिक्त असलेल्या 39 पदांसाठी दिनांक 22 आणि 23 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेश पत्र दिनांक 15 सप्टेंबर पासून संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जालना-पोलीस अधीक्षक कार्यालयातील 14 शिपाई आणि 25 शिपाई चालक अशा एकूण 39 पदांसाठी दिनांक 30 सप्टेंबर 2019 आणि 30 नोव्हेंबर 2019 रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांच्या लेखी परीक्षा दिनांक 22 आणि 23 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक 22 सप्टेंबर  रोजी सकाळी अकरा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान तर पोलीस शिपाई पदासाठी दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी अकरा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान घेण्यात येणार आहेत.

या परीक्षेसाठी उमेदवारांना आवश्यक असलेले प्रवेश पत्र www.aruangabadrangebharti.com या संकेतस्थळावर दिनांक 15 सप्टेंबर  पासून उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version