जालना परतूर तालुक्यातील सावरगाव येथे चारी वेदांचे मंदिर असलेले एकमेव चतुर्वेदेश्वर धाम आहे. इथे आजही गुरुकुल पद्धतीने सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद या चारही वेदांचे अध्ययन केले जाते.

महर्षी महमहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी स्थापन केलेले हे धाम आहे. या मंदिरामध्ये 52 व्या वार्षिक महोत्सवानिमित्त अथर्ववेद संहिता स्वाहाकार यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 14 ते 18 मे दरम्यान पार पडलेला या स्वाहाकार यज्ञाची पूर्ण होती मंगळवार दिनांक 18 रोजी झाली.
चतुर्वेद मंदिराची स्थापना दिनानिमित्ताने या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा हा उत्सव मागील वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे साध्या पद्धतीने आणि मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत मधेच पूर्ण करण्यात आला. पाच दिवस चाललेल्या या अथर्ववेद संहिता स्वाहाकार यज्ञासाठी लक्ष्मिकांत वझुरकर गुरुजी, देशिक शास्त्री कस्तुरे ,रोहित कावळे गुरुजी, यांच्यासह या मंदिरात ज्या विद्यार्थ्यांनी वेदअभ्यास केला त्या विद्यार्थ्यांनी देखील हा यज्ञ पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Share.

Comments are closed.

Exit mobile version