जालना

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जालन्याला धावती भेट दिली. या दरम्यान त्यांनी कोविड रुग्णालयात सुरू असलेल्या ऑक्सीजन प्लांट ची पाहणी केली, आणि त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांनी केलेल्या प्रश्नांचा भडिमाराला उत्तरेही दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्य मंत्री खासदार रावसाहेब दानवे ,माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर ,जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ ,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, आदींची उपस्थिती होती
या वेळी शरद पवारांची भेट, वाढलेले लॉक डाऊन, मराठा आरक्षण, ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण ,म्युकरमायकोसीस या प्रश्नांचा समावेश होता. नेमकी काय उत्तरे दिली फडणवीसांनी ते पहा.

Share.

Comments are closed.

Exit mobile version