जालना -जालना तालुक्यातील काजळा फाटा ते सामनगाव रोडवर लक्षुमि कॉस्टस्पून जवळ असलेल्या पुलाजवळ   35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. तालुका पोलीस या महिलेची ओळख पटविण्यासाठी कार्यरत आहेत. या महिलेच्या उजव्या हातात भगव्या रंगाचा दोरा असून हातावर इंग्रजी मध्ये विशाल हे अक्षर लिहिलेले आहे. बोटांमध्ये अंगठी आणि गळ्यामध्ये काळ्या मण्याची पोत असे या महिलेचे वर्णन आहे.  महिलेच्या या वर्णनाशी मिळती -जुळती महिला हरवल्याची कोणाची तक्रार असेल तर तालुका जालना पोलिसांना 84 596 10 483 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी केले आहे.

Share.

Comments are closed.

Exit mobile version