जालना -येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारेेेेे 35 स्टील उत्पादक कारखाने आहेत.  या कारखान्यांमध्ये हजारो हातांना काम मिळाले आहे. या कामासोबतच कामगार पुरवणारे कंत्राटदार ही वाढले आहेत आणि यातून कंपन्यांमध्ये अकुशल कामगार असल्यामुळे अपघाताचेे प्रमाणही  वाढलेआहे. कदाचित अपघाताचेेे वाढलेले हे प्रमाण घातपात असल्याची शक्यता  सप्तशृंगी स्टील आलाय प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालकांनी पोलिसांकडेे दिलेल्या निवेदनात केली असून याची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

गेल्या महिन्यात राजुरी स्टील  कारखान्याच्या परिसरात झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ सप्तशृंगी आलाय या कंपनीत देखील अपघात होऊन चार जणांना आपला जीव गमवावा लागला .दोन महिन्यांपूर्वी या कारखान्यांना कामगार पुरविणाऱ्या एका कंत्राटदाराचा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ भर दिवसा खून करण्यात आला होता. या सर्व घटना या अपघात नसून घातपात असल्याचा संशय कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. कारण दिवसेंदिवस कंपन्यांमध्ये लागणारे मनुष्यबळ वाढत आहे आणि त्यामधून कामगार पुरविणाऱ्या कंत्राटदार मध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान आत्तापर्यंत अशा कंपन्यांमध्ये अपघात झाले की पोलीस आणि संबंधित मयताचे नातेवाईक यांच्यामध्ये सुलानामा करून प्रकरण मिटवल्या जायचे मात्र आता कंपनी मालकांनी अशा प्रकारचे पत्र दिल्यामुळे याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे . सप्तशृंगी आलाय प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नुकत्याच झालेल्या अपघातामुळे कंपनीचे  दोन कोटींचे नुकसान झाल्याचे ही या कंपनीचे संचालक पुरुषोत्तम गोपीकिशन मुंदडा यांनी दिलेल्या निवेदनात केले आहे.

 

Share.

Comments are closed.

Exit mobile version