मंठा- जालना जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात विक्रीसाठी जाणारा सुमारे दीड लाखांचा गुटखा मंठा पोलिसांनी पकडला असून एकूण साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांनी मंठा जिंतूर रस्त्यावर कर्नाळा पाटी जवळ हा सापळा लावला होता.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास मंठा येथून जिंतूर कडे जाताना एक बोलोरो पिकप क्रमांक एम एच 22 ए एन 15 81 हे दिसले आणि त्याच्या पाठीमागे एक मोटरसायकल होती. या वाहनाला पोलिसांनी हात देऊन थांबवले असता वाहन चालक आणि त्याचा सहचालक बोलेरो वाहन उभे करून अंधारात पसार झाले, परंतु त्यांचे मोबाईल वाहनातच राहिले. या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास गुटख्याचे 404 पाकिटे ज्याची प्रत्येकी किंमत 192 रुपये आहे तसेच, एक्सएल 01 जर्दाचे बाराशे 16 पाकिटे, प्रत्येक पाकिटाची किंमत 48 रुपये प्रमाणे एकूण 58,368 रुपये आहे. आणि पाच लाखांचे बोलोरो पिकप, दहा हजारांचे मोबाईल असा सुमारे सहा लाख 6 लाख50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपी दीपक बोराडे हे नगरसेवक असून यापूर्वी देखील त्यांचा दोन वेळा पोलिसांनी गुटखा पकडलेला आहे.
पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस कर्मचारी राठोड, विलास कातकडे ,आनंद ढवळे, आसाराम मदने ,विजय झुंबड ,आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version