जालना- पोलिस यंत्रणेने डॉक्टरांवर थेट गुन्हे दाखल करू नयेत आणि, जर करायचेच असती तर महात्मा फुले जन आरोग्य योजने मार्फत तक्रार आल्यानंतर  करावेत. अशा सूचना पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत . अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेे यांनी दिली.

गेल्या आठ दिवसात जालन्यात चिरंजीव बाल रुग्णालय आणि मिशन हॉस्पिटल येथील डॉक्टरांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेे आहेत. रुग्णाकडून आणि महात्मा फुलेे जन आरोग्य अशा दोन्ही बाजूने हॉस्पिटलने बिल आकारल्याची तक्रार होती  .दरम्यान अशाा प्रकरणामुळे डॉक्टरकीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेे होते.

परंतु आता थेट गुन्हे दाखल न करता ज्या रुग्णालयांनी महात्मा फुलेे जन आरोग्य योजनेचे करार केलेले आहेत,  त्या करारातील तरतुदी नुसार आरोग्य योजनेच्या  अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरच  गुन्हे दाखल करावेत अशा सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत, असेही श्री .टोपे म्हणाले.

दरम्यान याचा अर्थ सामान्य नागरिकांवर अन्याय करावा आणि त्यांच्याकडून वाटेल तसे बिल आकारावे असेही नाही, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

*ताज्या आणि फक्त महत्वाच्या बातम्या पहाण्यासाठी प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा  edtv jalna app

Share.

Comments are closed.

Exit mobile version