Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » पेपरफुटी प्रकरण; बीडमधील भाजयुमोचा माजी पदाधिकारी ताब्यात पुणे पोलिसांची कारवाई
    राज्य

    पेपरफुटी प्रकरण; बीडमधील भाजयुमोचा माजी पदाधिकारी ताब्यात पुणे पोलिसांची कारवाई

    EdTvBy EdTvDecember 22, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    बीड : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधील भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी संजय सानप याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीसाठी पुण्यात गेल्यावर त्याचा सहभाग आढळल्याने पुणे सायबर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आता या प्रकरणात आरोपींची संख्या १८ झाली आहे. संजयच्या संपर्कात असलेले आणखी सहा जण रडारवर असल्याचे समजते.

    ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट ड परीक्षेचा पेपर फुटला होता. यात मास्टरमाईंड असलेले लातूरचे उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, आरोग्य अभियानचा सहसंचालक डॉ.महेश बोटले यांच्यासह १७ जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत. यात बीडमधील रहिवाशी असलेल्या ७ लोकांचा समावेश आहे. आता आठवा संजय सानपही जाळ्यात अडकला आहे. त्याला या प्रकरणात चौकशीसाठी पुण्याला बोलावले होते. यात अगोदरचा आरोपी असलेला राजेंद्र सानप याच्या संपर्कात राहून काही पुरावे हाती लागल्याने संजयलाही सोमवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढत चालली असून, यात आता पुढचा क्रमांक कोणाचा, याकडे लक्ष लागले आहे.

    ‘न्यासा’ कंपनीही संशयाच्या भोवऱ्यात-

    टीईटी परीक्षेत जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याचा सहभाग आढळला होता. तसाच सहभाग आता आरोग्य विभाग भरतीचे कंत्राट दिलेल्या न्यासाचाही असण्याची शक्यता आहे. न्यासा कंपनीचे दोन लोक बीडमध्ये गट क व ड चा पेपर घेऊन आल्याची चर्चा आहे. नगर रोडवरील एक व अंबिका चौकातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात त्यांनी शाळा भरवून प्रश्नांची उत्तरे सांगितल्याची चर्चा आहे.

    भांडण खेळणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रडारवर-

    जिल्ह्यातील संशय असलेले तीन कर्मचारी रजेवर गेले आहेत. यात पाटोदा तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वीच आपल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत वाद घातला होता. पेपर फुटण्याच्या काही दिवस अगोदर या डॉक्टरसोबत झालेले संभाषण पुरावा म्हणून ताब्यात घेणार आहेत. याच कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधिकाऱ्यालाही अडचणीत आणले असून, त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. रविवारी पुणे पोलिस वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती घेऊन व वडझरीला येऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

    संजय सानप हा चौकशीसाठी पुण्यातच होता. राजेंद्र सानप सोबतचा संवाद आणि इतर काही पुरावे मिळाल्याने त्याला अटक केली आहे.अशी माहिती पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली आहे.

    *edtv news beed*

    beed helth edtv helth exm puna
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleह.भ.प.महाराजांनी मिळवली नॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीची”डॉक्टरेट” पदवी
    Next Article या चार नगरसेवकांच्या प्रभागात निकृष्ट दर्जाची कामे, काँग्रेस मधून भाजपा मध्ये आलेल्या नगरसेविका सौ. देठे यांचा आरोप
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20252,417 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,162 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025720 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025516 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.