Jalna Districtजालना जिल्हा

अवैध गुटख्याचे माजलगाव येथे ठोक व्यापारी?

जालना- महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा माजलगाव येथील एका व्यापाऱ्याकडून घेऊन परतुर मध्ये विकणाऱ्या वाहन चालकाला परतुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांच्या गुटख्यासह वाहन जप्त केले आहे.

 

परतुर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परतूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वडारवाडी रस्त्यावर असलेल्या वैभव सांगोळे यांच्या गोदामा जवळ सापळा रचला, यावेळी माजलगाव येथून छोटा हत्ती क्रमांक एम एच 21 बी एच 3705 मध्ये अवैध गुटखा भरला असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांनी या वाहनावर छापा मारला असता वाहन चालक रामेश्वर इंद्रजीत फटिंग, वय 22 वर्ष राहणार हातडी, हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुटखा वैभव सांगोळे यांच्या सांगण्यावरून माजलगाव येथील एका व्यापाऱ्यांकडून आणला असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठावळे यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक संजय वैद्य यांनी तक्रार दिली आणि परतुर पोलीस ठाण्यात वैभव सांगोळे आणि रामेश्वर इंद्रजीत फटिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात बंदी असलेल्या प्रीमियम राजनिवास, गोवा 1000 हा गुटखा बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. साडेपाच लाख रुपयांचा गुटखा आणि साडेतीन लाख रुपयांचे वाहन असा एकूण 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, नितीन गट्टवार ,संजय वैद्य, शुभम ढोबळे, श्याम पांढरपोटे, विकास घाडगे, आबासाहेब बनसोडे आदी कर्मचारी सक्रिय होते.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.