Jalna Districtजालना जिल्हा

जागतिक आरोग्य दिनालाच रुग्णांची हेळसांड; सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जालना -जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशीच सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांची हेळसांड झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वर्ग तीन आणि चार च्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंदोलन सुरू केले. दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांनी मध्यस्थी करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्यासोबत चर्चा केली आणि यामधून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावे असे आवाहन केले.

त्यासोबत मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले .कर्मचाऱ्यांनी योग्य वेळेत आयकर विवरणपत्र सादर करूनही त्यांचे वेतन कपात करण्याची जबाबदारी ही प्रशासकीय अधिकारी यांची असताना त्यांनी ते केले नाही .त्यासोबत वेळेत टीडीएस न भरल्यामुळे  त्याच्यावर भरावा लागणारा दंड हा कर्मचाऱ्यांनी का भरावा? कारण यामध्ये कर्मचाऱ्यांची काहीच चूक नाही या आणि अन्य काही मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते. सकाळच्या पाळी मध्ये आलेल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या बाहेर प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून मागण्या मान्य करून घेण्यासाठी जोर दिला.

*रुग्णांची हेळसांड या* कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे  चिठ्ठी फाडण्यापासून ते वॉर्डांमध्ये तपासणी करणाऱ्या परिचारिका पर्यंत सर्वच कामे खोळंबली होती. त्यामुळे रुग्णांना देखील याचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन असताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलेल्या या रुग्णांची हेळसांड झाली आहे.


https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.