Jalna District

भाजीविक्रेत्याचा खून, डबल जीन भागातील घटना

जालना- जुना जालना भागात गांधीचमन परिसरात पालेभाज्या आणि फळे विक्री करणाऱ्या भरत मुजमुले या 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे.

आज पहाटे डबल जीन भागात असलेल्या दाट झाडीमध्ये कचऱ्याच्या ढिगावर भरतचा मृतदेह परिसरातील नागरिकांना दिसला. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू आणि कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात रवाना केला आहे .याप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. पहाटेच ची घटना उघडकीस आल्यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी वाढली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.


*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.