Jalna District

कारागृहातील सहा कैद्यांना कोरोनाची लागण

जालना-Covid-19 महामारीने हळू -हळू हातपाय पसरायला सुरुवात केली आहे . कोरोनाच्या मागील दोन्ही लाटेमध्ये सुरक्षित असलेल्या जालन्याच्या मध्यवर्ती कारागृहातील सहाकैद्यांना सध्या covid-19 ची लागण झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनास समोर एक चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

यापूर्वी दोन्ही वर्षी आलेल्या लाटेमध्ये कारागृहातील कैद्यांना covid-19 ची लागण होण्याचे होण्याचे प्रमाण कमी होते. कारण त्या काळात टाळेबंदी,आणि न्यायालय बंद होते. आणि गुन्हेगारीचे हे प्रमाण कमी होते. परंतु आता सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम कारागृहावर होत आहे. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपैकी पाच पुरुषांना व एका महिलेला असा एकूण सहा कैद्यांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यापैकी दोघा जणांवर कोविड रुग्णालयात तर चौघांवर राज्य राखीव पोलीस बल गटाच्या कॉमेडी सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत .सध्या उपचार सुरू आहेत . पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याची कोविड तपासणी करून न्यायालयात हजर करणे अपेक्षित आहे. कारण शिक्षा झाल्यानंतर त्या आरोपीला लगेच कारागृहात पाठविले जाते. सद्य परिस्थितीमध्ये आरोपीला पकडल्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली जाते आणि त्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने शिक्षा सुनावली तर कारागृहात पाठविले. जाते दरम्यानच्या काळात संबंधित आरोपीची rt-pcr तपासणी केल्यानंतर याचा निकाल येण्यासाठी एक ते दोन दिवसाचा वेळ जात आहे. त्यादरम्यान नवीन आलेला कैदी जुन्या कायद्यांच्या संपर्कात येऊन covid-19 लागण होऊन रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आरोपीला पकडल्यानंतर त्याची लगेच rt-pcr टेस्ट करावी जेणेकरून न्यायालयात उभे करून पुढील निकाल लागेपर्यंत संबंधिताच्या तपासणी चा निकाल हाती येईल.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.