जालना-स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर वेगवेगळे दुकाने थाटून आपले दुकान लावणाऱ्या दुकानदारांच्या दुकानाला आता जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी कायमची कुलूप लावले आहे.
जालना शहरातील मध्यवस्तीच्या, भर बाजारपेठेमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. या पुतळ्याच्या भोवती अतिक्रमण करून काही स्वयंघोषित नेते इतरांना जागा देऊन त्यांच्याकडून भाडे वसूल करतात. असाच प्रकार गणेशोत्सव आणि दुर्गादेवीच्या काळात उघडकीस आला आणि दुकान लावणाऱ्या लहान लहान दुकानदारांनी कोणाला पैसे दिले हे स्पष्ट सांगून टाकलं.

त्यामुळे ही सगळी दुकानदारी उघडी झाली आणि एकंदरीत सावरकरांच्या पुतळ्यासमोर असलेले या दुकानदारीबद्दल शहरातील सावरकर प्रेमी जनतेमध्ये संताप उसळला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या दुकानांना देखील या सावरकर प्रेमींनी विरोध करून स्वयंघोषित नेत्यांची दुकानदारी उधळून लावली. यासंदर्भात सावरकर प्रेमींनी आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांना निवेदन दिले.

या निवेदनांची दखल घेत अंजली शर्मा यांनी या पुतळ्याभोवती 50 मीटर अंतरात कुठलीही दुकान लावण्यास बंदी घालणारा आदेशच काढला आहे त्यामुळे भविष्यात इथे दुकान लावणे आता महागात पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात ईडीटीव्ही न्यूज ने देखील आवाज उठवला होता त्या संदर्भातील बातमी वर दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता.——
दिलीप पोहनरेकर,9422219172




pkr99gamedownload
The installation was a breeze and the app runs perfectly on my phone. No crashes and the graphics are top notch. Highly recommend pkr99gamedownload for anyone wanting to play on the go