घनसावंगी -समर्थ रामदास स्वामी ज्या श्रीराम मूर्तींची पूजा करत होते अशा सुमारे सातशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीची दोन दिवसांपूर्वी जांब समर्थ येथून येथील श्रीराम मंदिरातून चोरी झाली. अद्याप पर्यंत पोलिसांना या मूर्तींचा तपास लागलेला नाही. याच्या निषेधार्थ पूर्ण जांब समर्थ गावचे ग्रामस्थ आणि परिसरातील रामभक्तांनी आज सकाळपासूनच गावामध्ये श्रीराम मंदिरासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

सुरुवातीला गावच्या वेशीवर असलेल्या मारुती मंदिरासमोर सर्व गावकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात हे सर्व गावकरी आणि वारकरी गावातील श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचले आणि तिथे त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे .दरम्यान गावकऱ्यांनी हे एकच दिवस लाक्षणिक उपोषण करावे असे आवाहन समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी यांनी केले आहे, परंतु गावकरी आणि वारकऱ्यांच्या मतानुसार जोपर्यंत मूर्ती सापडत नाहीत तोपर्यंत उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version