दिवाळी अंकराज्य

आनंदोत्सव पुनर्जन्माचा

नमस्कार !
सर्वांना दिवाळीच्या, आनंदोत्सवाच्या खूप- खूप शुभेच्छा!
बदलत्या काळानुसार बदल घडवून आणणं हे माणसांच्या स्वभावातच आहे. त्याला प्रसारमाध्यमं तरी कशी अपवाद असणार? आणि म्हणूनच डिजिटल च्या जमान्यात आम्हीदेखील वाचकांसाठी “अंकुर”हा डिजिटल दिवाळी अंक घेऊन आलो आहोत. आमच्या साठी नवीन फुटलेला हा अंकुरच आहे.खरंतर दिवसेंदिवस वाचनाला सवड मिळत नाही,आणि सवड मिळाली तर दिवाळी अंक मिळत नाही. आणि दिवाळी अंक मिळालाच तर त्याचही आता( वजनाने आणि पैशाने) ओझं  होत आहे..या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी आमचा हा खटाटोप. कुठेही, कधीही, कोणालाही, आणि कोणतही ओझं नसलेला असा हा Ed (इलेक्ट्रॉनिक डिजिटल) टीव्ही चा दिवाळी अंक.

गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोना या जागतिक महामारी शी झुंज देत आहोत. यामध्ये अनेकांना आपले आप्तस्वकीय गमवावे लागले. हे दुःख तर उराशी आहेच! परंतु त्यावर फुंकर घातली पाहिजे आणि कदाचित यासाठीच ईश्वराने आपल्याला मागे ठेवले असावे. म्हणून या जीवघेण्या संकटातून आपण वाचलो आहोत. म्हणजे पुनर्जन्म झाला आहे असे मी मानते. कोणाचा विश्वास असो अथवा नसो जो या संकटातून गेला आहे त्याला विचारले तर तो निश्चितच “पुनर्जन्म” झाला आहे हे मान्यच करेल. म्हणून ही दिवाळी म्हणजे “आनंदोत्सव पुनर्जन्माचा” असेच म्हणेल.

गेल्या 23 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये योगदान दिलेल्या दिलीप पोहनेरकर यांनी Edtv ला नावारुपाला आणण्यासाठी आपले अनुभव खर्ची घातले आहेत.  या दिवाळी अंकासाठी  मानद संपादक म्हणून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रा.सुहास सदाव्रते विनंती केली आणि त्यांनीही ती तेवढ्याच तत्परतेने स्वीकारून होकार दिला. बळीराजा प्रमाणेच या इलेक्ट्रॉनिक डिजिटल टीव्ही ची ही पेरणी जून 2021 मध्य केली आहे .अतिवृष्टीमुळे बळीराजाची वाताहात झाली. मात्र ईश्वर कृपेने अवघ्या चार महिन्यातच डिजिटल पोर्टल चैनल नावारूपाला आला आहे, आणि याचा पुरावाच द्यायचं म्हटलं तर सर्व बाबतीत तावून सुलाखून निघाल्यानंतर गुगल अशा ऑनलाइन डिजिटल पोर्टल ला जाहिरात देतं आणि त्या आपल्याकडे सुरूही झाल्या आहेत.
कोविडमुळे जालनेकरांच्या श्रद्धा स्थानांवर अनेक संकटे आली, अनेकांना उपाशी बसावे लागले, त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारी सलग २५ दिवस चालवलेली “जालनेकरांचे श्रद्धास्थान” ही एक मालिका. ज्या स्वातंत्र्यसैनिकांमुळे आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करणारी ५ दिवसांची” गौरव स्वातंत्र्यसैनिकांचा” ही दुसरी मालिका. एवढेच नव्हे तर पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन कदाचित एक पाऊल पुढे टाकून सार्वजनिक क्षेत्रात, राजकारण, समाजकारण, सरकारी नोकरी, न्याय-निवाडा, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ रणरागिनींना प्रकाश झोतात आणणारी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी नवरात्रात नऊ दिवस चालवलेली “रणरागिनी” ही मालिका .या झाल्या मालिका, यासोबत दैनंदिन घडामोडी आणि त्याही चित्रीकरणास सह वाचकांपर्यंत दिल्या आहेत. त्यांची संख्या सांगणे इथे कठीणच आहे.
एक मात्र नक्की की हे सर्व करण्यासाठी बळ मिळते ते वाचकांच्या आणि जाहिरातदारांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे. Edtv jalna ची ही २ चाके आहेत. जी आम्हाला काम करण्यासाठी बळ देतात .त्यामुळे या दिवाळीच्या निमित्ताने वाचक आणि जाहिरातदार यांच्याकडे एकच मागणी आहे की, आपण सदैव आमच्या पाठीशी राहावे ही विनंती.

                           मेघा पोहनेरकर
                   संचालक संपादक ,edtv jalna

आपण हा दिवाळी अंक आणि मागील सर्व बातम्या www. edtv jalna. com या वेबसाईटवर आणि edtvjalna हे एप डाउनलोड करून पाहू शकता.किंवा  https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EDTvJalna.apk या लिंकवर देखील डाउनलोड करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.