जालना- भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज दिवसभर जालन्यात होते. माजी मंत्री अर्जुन खोतकर हे सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. विशेष म्हणजे ज्या बाजार समितीची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे .त्याच बाजार समितीचे उपसभापती म्हणून खासदार रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे आहेत. या पाहणीनंतर त्यांनी अर्जुन शुगर या नावाने सुरू होत असलेल्या जालना सहकारी साखर कारखान्याला ही भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर हे कशा प्रकारे अनाधिकृत कामे करत आहेत याविषयी त्यांनी अनेक आरोप केले. या आरोपा संदर्भात अर्जुन खोतकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया.

 

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version