अंबड- तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परिसरातील अनेक गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे .त्याचाच एक भाग म्हणून नुकताच पैठण रस्त्यावर रास्ता रोको ही करण्यात आला होता. या रास्ता रोकोला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने संपूर्ण बंदोबस्त देऊन या रस्त्यावरील वाहतूकही वळविली होती .त्यामुळे हा रास्ता रोको कुठलीही दुर्घटना न होता पार पडला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला होता. या उपपरही हे आंदोलन सुरूच राहिले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्या गेले आणि उपोषणकर्त्यांचीही समजूतही काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यातच दिनांक ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जालन्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच या आंदोलनाचा बंदोबस्त लक्षात घेता प्रशासनाने हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी न झाल्याने आज दुपारी अंतरवाली सराटी या आंदोलनाच्या ठिकाणी वाद वाढला आणि त्यामधून पोलिसांनी लाठीमारही केला आहे. आंदोलन कर्त्यांसोबतच महिला पोलीस कर्मचारी ही मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत.दोन वर्षांपूर्वी देखील साष्ट पिंपळगाव येथे अशाच प्रकारचे आंदोलन सुमारे तीन महिने सुरू होते.
Edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com ,yt-edtvjalna