बदनापूर- सातबारावर अज्ञान पालन कर्ता, ही नोंद कमी करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील निकळक येथील वर्ग 3 च्या तलाठी श्रीमती रेखा पुरुषोत्तम मानेकर वय 32, राहणार समर्थ नगर जुना जालना यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या सातबारावर अज्ञान पालन कर्ता असे नाव आहे, ही नोंद कमी करण्यासाठी तक्रारदाराने ऑनलाईन अर्ज केला होता परंतु ती नोंद कमी झालीच नाही. त्यामुळे पुन्हा लेखी अर्ज केला. या अर्जाच्या अनुषंगाने निकळक सज्जाच्या तलाठी रेखा मानेकर यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याशी संपर्क साधला. तक्रारदाराच्या या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तलाठी रेखा मानेकर यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आणि त्या अनुषंगाने आज निकळक सज्जाच्या तलाठी रेखा मानेकर यांच्या साठी बदनापूर येथील हुसेन नगर भागात खाजगी कार्यालयामध्ये लाच घेताना रंगेहात पकडले आहे. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172