जालना- लॉयन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या वतीने शनिवार दिनांक 12 रोजी एक दिवशीय “शिखर”या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशातील विविध राज्यांच्या वेशभूषा सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे “शिखर” गाठण्याचा प्रयत्न केला गेला.
शनिवारी दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी पुरुषोत्तम जयपुरिया, बलबीर सिंह सहानी, सुनील देसरडा, गिरीश सिसोदिया, विजय बगडिया, यांच्यासह रीजनल चेअर पर्सन सुनील बियाणी यांची उपस्थिती होती.
विविध टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि सायंकाळच्या सत्रामध्ये लॉयन परिवाराच्या वेगवेगळ्या विभागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले. त्यामध्ये आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथील ब्रह्मवृंद, पाण्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट ,पंढरीचा विठ्ठलाची दिंडी, यासह विविध सामाजिक संदेशही यावेळी देण्यात आले, जालना विभागातून सुमारे पाचशे लायन्सचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला मनोहर खारापुरे डॉ. सुयोग कुलकर्णी, श्यामसुंदर लोया, मोहन इंगळे, सुभाष देविदान, अतुल लड्डा ,महेंद्र वाघमारे, डॉ.गिरीश पाकणीकर ,जगत घुगे राजेश फादाट, आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com