जालना- शहरातच नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंध असलेला गुटखा विकल्या जात आहे हे सर्वश्रुत आहे. गुटक्याचे कंटेनर सापडतातही मात्र त्याचे पुढे काय होते ?आणि कोणाचे असतात हे मात्र उघड होत नाही परंतु गेल्या अनेक वर्षानंतर जालन्यात येणारा गुटखा तालुका पोलिसांनी पकडून हा मुद्देमाल कोणाचा आहे हे उघड केले आहे आणि संबंधित सात आरोपींना अटक केले आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.टी. सुरवसे यांना मिळालेल्या माहितीनुसार दि 11 ते 12 च्या मध्यरात्री सिंदखेड राजा ते जालना रस्त्यावर नाव्हा परिसरात नाकाबंदी केली. जालना शहरात येणारे कंटेनर क्रमांक एच. आर. 55 क्यू 26 07 हे थांबून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी प्रतिबंध असलेला विविध प्रकारचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्याच पाठोपाठ आणखी एक आयशर क्रमांक एम एच 07 पी 28 37 हे येत होते, या वाहनाचीही तपासणी केली असता त्यामध्ये 24 लाख 9 हजार रुपयांचा गुटखा सापडला आहे. या दोन्ही वाहनांची तालुका पोलीस ठाण्यामध्ये रवानगी करून मोजणी केली असता कंटेनरमध्ये 44 लाख 950 रुपयांचा गुटखा आणि आयशरमध्ये 24 लाख 9 हजार रुपयांचा गुटखा सापडला आहे. सुमारे 75 लाखांचा गुटखा आणि 75 लाखांची वाहने असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनचालकांसह या गुटक्याचे मालक सतीश प्रकाशलाल जयस्वाल आणि उमेश प्रकाश लालजयस्वाल राहणार गवळीपुरा जालना, समीर सय्यद युनूस राहणार गांधीनगर जालना, मेहबूब खाजा शेख राहणार गांधीनगर जालना, अमोल हरिभाऊ भोईटे राहणार सम्यक नगर चंदनझीरा जालना, परमेश्वर कारभारी घुले राहणार वखारी तालुका जालना, निलेश मधुकर जाधव रा. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या सात जणांना अटक केली आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरवसे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे दिगंबर पवार विष्णू कोरडे सुनील गांगे राम शिंदे रामराव चापलकर या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172